Saturday, December 31, 2011

राजगडाचे अश्रू .....


- ओम पाठक
हा तोच गड आहे ज्या गडावर छत्रपतीनी बालपणापासून स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पहिले व वयाच्या १६ व्या वर्षी स्वराज्य स्थापले ते तोरणा गड घेवून. त्या मोहिमेचे डावपेच याच राज गडावर आखण्यात आले, हाच राज गड मात्र आज वेदनेने विव्ह्लतो आहे, कारण अधुनेक्तेची पट्टी डोळ्याला बांधून याच गडावर तरून व तरुणीन कडून होणाऱ्या धीगाण्याने, हयाच गडाने कधी काळी स्वराज्याखातर प्राण पणाला लावलेले शिवरायाचे मावळे बघितले आहे पण आज हाच गड रडत आहे तो त्याच्या अपमानाने.
मागच्या वर्षी ह्यच डीसेबर महिन्यात संभाजीनगरचे (औरंगाबादचे) माझे मित्र जे दुर्ग प्रेमी आहेत त्यांनी  मला राज गडावर येण्याचे आमंत्रण दिले व राज गड मोहिमे बद्दल सांगितले. मुळात ट्रेकिंग हा माझा आवडीचा भाग असल्यामुळे मी लगेच होकार दिला त्यासाठी आम्ही निघालो ते २८ डिसेम्बरच्या रात्री व २९ ला सकाळी पुणे गाठून आम्ही राज गडाकडे निघालो या पूर्वी राज गड कधी पाहिलेला नसल्याने तो पाहण्याची उत्सुकता लागली होती. दुपारी १२ च्या सुमारास गडाच्या पायथ्याशी आमचा मूक्काम होता. व तेथील गड प्रेमी हि येवून पोहचलेले होतेच त्याच्याशी आमचा परिचय झाला व त्यांनी आम्हाला तेथील कार्यक्रमाची माहिते दिली त्यात महत्वाचे मुद्दे म्हणजे ३० डिसेम्बारच्या रात्री येणाऱ्या तरुणाना कडून दारू , गुटखा , इतर व्यसनाचे समान काढून घेणे व नंतर त्यांना गडावर जाऊ देण्यास परवानगी देणे हे होते शिवरायांनी स्थापलेल्या स्वराज्यातील सर्व गडावर असलेली गाड श्रद्धा व प्रेम असलेले सगळे तरून तेथे आलेले होते, मी पहिल्यादा ह्या मोहिमेत सामील झाल्यामुळे मी खूप उत्सुक होतो . जशी जशी संध्याकाळ होऊ लागली तसे तसे तरून व  तरुणी तेथे जमा होऊ लागले त्यात काही मोठी मंडळी हि होती जी बँक व कंपनी च्या मोठया हुद्यावर काम करणारी होती. पुण्यातील गड प्रेमीनी  सरकारने लावलेल्या पण गंज चढलेल्या न दिसनाऱ्या इशाऱ्याच्या पाटी कडे कोणाचे लक्ष जाणार नाही म्हणून मोठे फ्लेक्स गडावर कोणतेही दारूच्या बाटल्या व इतर अश्लील साहित्य नेवू नये ते इथेच काडून टाकावे अशा इशाऱ्या सह लावलेले होते, पण हे तरून मंडली त्याकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष करतांना दिसले व ते लगेच राज गड चढण्याचे प्रयत्न करत होते. मी  नवीन असल्या मुळे मला पहिल्या चेक पोस्ट वर ठेवण्यात आले व त्यांची तपासणी करण्याची सूचना करण्यात आली , त्या तयारीत मी उभाच होतो तितक्यात तिथे काही तरून जे ११ वि मधील होते ते आले त्याची तपासणी केली असता त्याच्या ब्याग्स मध्ये ७ दारूच्या बाटल्या निघाल्या नीटश्या मिशा न फुटलेल्या त्या तरुणा कडे पाहून मला धक्काच बसला त्यातील काही तरून तर मित्राकडे अभ्यासाला चाललो हे घरच्यांना सांगून आलेले होते
जस जसे रात्र होत गेली तसे तसे अनेक तरुणांनाकडून ४ पोते दारूच्या बाटल्या १ पोते  गुटखा व इतर साहित्य जमा करण्यात आले हे पाहून माझी तर झोपच उडाली होती शिवरायाचा व स्वराज्याच्या एका सक्षिदराचा होणारा अपमान हा सहन करणारा नव्हता
त्यात काहींनी तर जुनाट विचारी लोक जग पुढे चालले व हे लोक अजून इथेच अशा प्रकारे ओरड करत आमच्याशी भाडू देखील लागले पण त्यांना तुम्ही आज जे करता ते का शक्य जाले याची तुम्हाला जाणीव आहे का असे विचारले असता मात्र ते गप्प झाले.
त्यातील एक प्रसगी तर एक तरुणी मी डॉक्टर आहे असे ओरडून भांडायला लागली त्यात आमच्या सोबत असलेल्या डाक्टर ने तिला त्याचे विजीतिग कार्ड दिले व ती माफी मागून निघून गेली. पण हे सर्वे अनुभव इतके दुर्दैवि व दुखद होते.
रात्रीचे १२ वाजले होते आत्ता कोण येते असे माझ्या मनात होते माझे काही मित्र झोपी गेले होते तर काही शेकोटी जवळ बसलेले होते माझी झोप उडाल्याने मी हि तिथेच बसलेलो होतो तेवढ्यात एका दुचाकीचा आवाज आला त्यावर एक तरून व तरुणी आले इतक्या रात्री ह्या जंगलात कसे हा विचार सर्वाना पडला त्या तरुणाची तपासणी केली असता त्या कडे गुटखा पुडी व्यतिरिक्त काहीच नव्हते तरी आमच्यातील एकाला हे पटेना त्यांनी त्या तरुणीला तिचे पर्स व खिश्यातील वस्तू बाहेर काढायला सांगितले तेव्हा बघतो तर काय त्यात निरोधचे पाकीट निघाली या विषयी विचारले असता इथे नेहमी चेकिंग होते तुम्ही तरुणीची चेकिग करणार नाही यामुळे हे पाकीट माझ्या कडे देण्यात आले असे त्या तरुणीने सांगितले हे एकूण मात्र आम्ही आवाक झालो,हे तर सोडा सकल चौकशी केली असता तो तरून फक्त १० वि फेल उच् गोरा व तरुणी MBBS च्या ३ रया वर्षाला शिकत असल्याचे आढळून आले हे एकतच ती तरुणी हि आशर्यचकित झाली आज पर्यत तिला त्याचा शिक्षण बद्दल माहीत नव्हते तो फक्त उच् गोरा असल्यामुळे मला त्याच्याशी प्रेम झाले असे सांगण्यात आले ती तरूनी कोलेज पासून घर ३० कि.मी आहे म्हणून कॉलेजच्या होस्टेल वर राहत होती या घटने कडे पाहून मनात विचार आला प्रेम खरेच आंधळे असते का ?
सकाळी उठून राजगड चढायचा असल्याने आम्ही रात्री ३ च्या आसपास झोपी गेलो ते ह्या सर्वे घटना मनात ठेऊन सकाळी ७ वाजता राजगडावर चढणे सुरवात केली व ११ वाजे ला वर पोहचलो तेथील शांत निसर्गरम्य परिसर पाहून मन प्रसन्न होण्येवजी दुखी होते कारण रात्री घडलेल्या त्या सर्वे प्रकारामुळे गडावर सुद्धा काही दारूच्या बाटल्या आढळल्या त्या बाटल्या आम्ही सर्वानी जमा केल्या व पोत्यात भरून ठेवल्या गडाच्या भिंतीना जास्त थडी मुळे व धुक्या मुले ओलावा जाणवला पण तरी मनात विचार आला हा गड रडत तर नसेल ?
दुपारी ४ वाजेच्या सुमारास आम्ही पुन्हा खाली आलो व सर्वाना पुन्हा दुसऱ्या दिवशी कामावर जायचे असल्याने पुन्हा घरी निघण्याची तयारी चालू केली त्यात सापडलेल्या सर्वे दारू सांडून देऊन व गुटखा पुड्याची होळी करून नंतर तेथील महादेव मंदिरात आरती करून पुन्हा आम्ही प्रतीचा प्रवास सुरु केला त्या वेदनेने भरलेल्या ह्रदयाने .शेवटी एकच ह्या तरुणांना सांगावेसे वाटते तुम्ही दारू प्या अथवा आणखीन काहीही करा याला आमचा विरोध नाही तो तुमचा व्ययक्तीक प्रश्न पण हे सर्वे गडावर व कोणत्याही पवित्र स्थळी करण्यास आमचा विरोध आहे.

No comments:

Post a Comment