Friday, February 18, 2011

नमो शिवराय !!

वंदेमातरम्‌ ! नमो शिवराय !!
शिवछत्रपती, महाराष्ट्रच नव्हे तर या संपूर्ण भारत वर्षाचे मानबिंदू...प्रेरणा...आदर्श असे अनेक काही आहेत ! जे आहेत ते उत्तम आहे... चांगले आहे... सफल आहे पण...आचरणात किती हाच खरा प्रश्न आज शिवजयंतीला मनात येतो. आम्हाला शिवरायांबद्दल आदर आहे...अभिमान आहे... पण पुढे काय ? त्याच करायचं काय ? नुसता व्यर्थ अभिमान आणि त्यातून येणारी व्यर्थ चेतना या दोन्ही गोष्टी निरुपयोगी आहेत. नुसती भाषणे....नुसती व्याख्याने आणि पोवाडे याने शिवकार्य कदापी शक्य नाही.
शिवनीती...शिवकार्य हा फक्त अभिमानाचा, पोवाड्याचा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या तात्पुरत्या चेतनेचा विषय नाही. ह विषय आहे अचरणाचा... कार्याचा ! सामाजिक जीवनात शिवजयंती साजरी करायची आणि घरी गेल्यावर तर काय ‘हम भले और हमारा घर भला’. हि गोष्ट नाही चालणार. कधीच नाही चालणार !! तेव्हा शिवजीमहाराजांना रंजक इतिहासातून बाहेर काढले पाहिजे.
आयुष्भर तळ हातावर प्राण घेऊन हा माणूस रक्ताच पाणी करत होता ते देशद्रोही...धर्मद्रोही यांच्या विरुद्ध लढण्यासाठी. तेव्हा आता तरुणांनी आज होणारी ‘स्व’ त्वावरची आक्रमणे ओळखावीत व त्या विरुद्द काम सुरु करावे. केवळ इतिहास चघळत बसू नये. आपणास असे महाराज पचत नसतील तर इतर आदर्श घ्यावेत... भारतात ते भरपूर आहेत. उगीच ‘ आधुनिक ‘ शिवभक्त होऊन ‘ महाराज ‘ विषयाची तीव्रता, त्याचे तेज कमी करू नये. ‘ शिवराय ‘ या नावाच्या वाटे जाऊ नये. आणि जर आदर्श घ्यायचा असेल तर हळहळने सोडावे, रडगाणी बंद करावी (मला कॉलेज आहे... मला क्लास आहे..अशी पुळचट कारण देऊ नये) सहानुभूतीची अपेक्षा सोडावी- व ‘स्व’यम्भू व्हावे – स्वतःला प्रश्न विचरणे सुरु करावे –सगळ सांभाळून शिवाजी महाराजांची जास्तीत जास्त तसबीर घेता येते आदर्श नाही !!
छातीत निर्भय श्वास दे
साथीस कणखर हात दे
फुत्कारणाऱ्या संकटाना
ठेचनारे पाय दे....
छातीत निर्भय श्वास दे..!!!

(याहुनी करावे विशेष... तरीच म्हणवावे पुरुष !!)
प्रकाशक: अभिनव निर्माण प्रतिष्ठान, महाराष्ट्र प्रदेश
(anpresponse@gmail.com)

No comments:

Post a Comment