Thursday, June 23, 2011

खरा नास्तिक


- ओंकार कुलकर्णी 
anpresponse@gmail.com


कुठल्याही माणसाला स्वतःला दैववादीम्हणावान्या  पेक्षा प्रयत्नवादीम्हणवले गेलेले जास्त चांगले वाटेलकाही प्रयत्नवादी म्हणवणारे लोक स्वतःला नास्तिक म्हणवतात
नास्तिक म्हणजे देव आहे हे न मानणारा . या ठिकाणी देव म्हणजे अस्तीकाने मांडलेली / केलेली कल्पना
भागतसिंग हि नास्तिक होते .त्यांनी लिहिलेल्या मी नास्तिक का आहेया निबंधाचा संक्षिप्त भाग,“देवाचा उगम कसा झाला याबद्दल माझी अशी कल्पना आहे कि माणसाच्या मर्यादा, दुबळेपणा, तृटी यांची झालेली जाणीव विचारात घेवून सर्व परिस्थितीनं धैर्याने तोंड देण्यासाठी, सर्व प्रकारच्या संकटाना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी, भरभराटीच्या व समृद्धीच्या काळात माणसाला आवर घालण्यासाठी व त्याच्या वागणुकीवर ताबा ठेवण्यासाठी देवाचे काल्पनिक अस्तित्व निर्माण करण्यात आले. माणूस समाजाला विघातक ठरू नये यासठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून देवाचा उपयोग व्हावा म्हणून दैवी कोप व दैवी नियम या कल्पना मांडल्या गेल्या. मनुष्य जेव्हां अत्यंत निराश अवस्थेत असेल तेव्हां आधार द्यायला कुणीतरी आहे व तो सर्व शक्तिमान आहे या .कल्पनेमुळे त्याला आधार मिळतो. व त्याची श्रद्धा ठाम होत जाते……….”शहीद भगतसिंगआस्तिक असणे किंवा नास्तिक असणे हा वैयक्तिक प्रश्न आहे.मुळात माणसाला जगण्यासाठी कोणत्या ना कोणत्या श्रद्धेची गरज असतेहे म्हणणे अगदी बरोबर आहे . भगतसिंग यांची देशावरची श्रद्धा , आस्तिक नास्तिक असण्यापेक्षा मोठी ठरली.पण मला तरी असे वाटते किखरा नास्तिक कुणी असतो का हो?.कारण असे किती तरी नास्तिक पहिले आहेत जे आपल्या धर्मातील देवांना नाही तेवढे नवे ठेवतील .पण ज्या वेळेस दुसर्या धर्मातील देवतांचा ,त्यांच्या अंधश्रद्धांचा ,परंपरागत चालत आलेल्या चुकीच्या रुढींचा प्रश्न येईल त्यावेळेस ती त्यांची संस्कृती आहे असे काहीतरी गुळगुळीत बोलतात .एका अशा नास्तिकाला मी विचारले असता नास्तिक याचा अर्थ देव न मानणारा . मग तो विश्वाची माझे घर अशी भावना असणारा नसेल कदाचित . आपल्या धर्मातल्या लोकांचे आधी भले व्हावे असे त्याला वाटतअसेलअसे केविलवाणे हास्यास्पद उत्तर मला मिळाले .मग वाटले तो नास्तिक नसून स्वार्थी आहे .केवळ आपल्या बाबत आपल्या धर्माबाबत विचार करणारा आहे .म्हणजे या कारणाने का होईना तो धार्मिकविचारांचा झाला.कारण आत्ताच्या सामाज्सुधाराकांपैकी हमीद दलवाई सोडले तर असे कुठलेच नास्तिक समाजसुधारक नाहीत कि जे आपल्या धर्मातील चुका दाखवण्याबरोबर इतरांच्याही धर्मातील चुका दाखवतील .याविषायाबरइतरांशी चर्चा केली असता काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे माहित नसलेल्या गोष्टी बद्दल जास्त भाष्य न केलेलेच बरे.”.अश्या प्रवृत्तीतून असे होत असावेजसे.कि काही डोक्यापलीकडचे असेल.. ज्याची कार्यकारण मीमांसा कळत नाही ते सगळे देवाच्या…/ अल्लाच्या/ येशू च्यानाहीतर अजून कोणाच्या तरी नावावर खपवायचे…!”पण मला असे वाटते कि ,जर तुमची देवाविषयीची संकल्पना पूर्ण स्पष्ट आहे आणि बुद्धीला पटेल तेच सत्य असे असेल तर माहित नसलेल्या गोष्टी ….”वगैरे कुठे आड येताच नाही .नाहीतर मग त्या तथाकथित नास्तिकांना अशी शंका तर उपस्थित होत नसेल ना कि आपल्या धर्मातील देव खोटा आहे पण दुसर्या धर्मातील देव खरा कि खोटा याविषयी आपल्याला माहित नाही त्यामुळे ना बोललेले बरे म्हणजे दुसर्या धर्मातील देवांबद्दल तुम्ही साशंक आहात ,मग कुठला बुद्धिवाद आणि कुठले नास्तिकत्व ?माझ्यामते जो खरच नास्तिक आहे त्याला देव आहे, देव नाही या गोष्टींवरही चर्चा करणे म्हणजे वेळ वाया घालवणे असे समजून विषय सोडून देतात .पण जे मी नास्तिक आहे असे दाखवून देण्यासाठी फक्त त्याच विषयांमध्ये रस घेत बसतात त्यांना फक्त आपण स्वतः कसे बरोबर आहोत आणि इतर कसे चूक एवढेच दाखवून द्यायचे असते .माझ्या मते आस्तिक-नास्तिकत्व वरून भांडणे म्हणजे केवळ बौद्धिक हस्थ्मैथून किंवा सभ्य शब्दात आपली तोंडाची वाफ घालवणे आहे .हे लेख लिहिण्याचा प्रपंच म्हणजे केवळ माझा उद्वेग आहे कारण मी स्वतः आस्तिक नास्तिक अशा कुठल्याही संकल्पनेत बसत नाही कारण कृष्णाने गोवर्धन उचलला ‘,’ब्रम्हाच्या पोटातून कुठलासा राक्षस निघाला ‘,’वगवेगळी व्रते केल्याने इप्सित सिध्द होते ‘, असल्या फालतू कथांना मी उडवून लावतो .पण त्याच वेळी विश्वची निर्मिती करणारी कुठली तरी शक्ती असली पाहिजे असेही मी मानतो .
पण मी आस्तिक नाही देवधर्म मनात नाही” ,असे फक्त स्वतःपुरते न ठेवता,तुम्हीही तसे करा ,असे सांगून इतरांचा फक्त बुद्धीभेद करणे व याचा चुकीच्या गोष्टींसाठी वापर करणे मला पटत नाही .

No comments:

Post a Comment