Tuesday, December 31, 2013

जात !! (भाग १)



-भाग्यतुषार


सध्या आरक्षण, मनुवाद ही संकल्पना आणि जातीचा अक्रंदी अभिमान भलताच फुलतो आहे. जन्माने-वंशाने लागलेल्या फालतू जाती विशेषणाचा अभिमान बाळगणे हा आजचा नवा ट्रेंड झाला आहे. इतक्या दिवस जातीय भावनेचा प्रचार पुस्तके, पॉम्पप्लेट व इतर माध्यमातून होत असे. आता तर या जातीचे बोंबील social media च्या माध्यमाने sophisticated form मध्ये तरुणांन समोर ठेवले जात आहे. यात भर म्हणजे वधुवर परिचय मेळावे. साली कल्पनाच पचत नाही की अश्या पद्धतीने गुराढोरांचा बाजार असल्यासारखं मुलं मुली शोधायच्या. 


सध्या बऱ्याच जाती विशेषण असलेल्या लोकांशी संपर्क चालू आहे. एक गोष्ट नक्की सांगतो कितीही गोरे असतील, कितीही श्रीमंत असतील आणि कितीही हिंदुवादी (हिदुत्ववादी नाही) असतील पण जातीचा भलता पोक्कळ अभिमान. मुलगी किवा मुलगा दुसऱ्या जातीत द्याची ना तयारी, ना मानसिकता आणि साध समर्थन पण नाही. आंबेडकरी जनतेच म्हणाल तर त्यांनी पार स्वताला सगळ्या समाजापासून तोडून टाकलं...किवा तोडले गेले ... जे काही असेल... द्वेषाच चक्र गोलच फिरणार. इतक्या दिवस सवर्णांनी दलितांचा द्वेष केला आता ते करता आहे. म्हणज शेवटी काय “eye for an eye”. 


या मानसिकतेत काय कितीही केजरीवाल येओ... किती मोदी येओ.... ये बावळट लोक जातीचा तुरा मिरवत समानतेच्या समाज व्यावास्तेचा फडशा पाडणारच. “XXXXX गेली समाज व्यवस्था...” हिचा भावना आज तुमचा आमचा मनात आहे. आमची मुलगी आमच्याच जातीत लग्न करणार... किवा मुलगा असो ... ते सगळं सारखचं. राजपूत, मराठे, गुजराती, मारवाडी, सिंधी, पंडित (ब्राम्हण), जैन  किवा बाकी कोणी, आपण यांना एक समाज विशेषण मानतो... जात नाही.. पण कितीही व्यापक विचार केला तरी हे विशेषण आणि हे गृहीत धरण समाज हिताच कधीच नसणार. हे जाती विशेषणचे आहेत. आपण फक्त “जात” न म्हणता याला “समाज” असा सभ्य शब्द वापरतो. पण संविधानात society आणि caste असे विगळे शब्द आहेत. हे दोन्ही समान नाही. लादेनला माननीय किवा श्री म्हणून त्याचा खरा अर्थ बदलणार का. 


मित्रहो डोळे उघडा... जात सोडा... नुसता रोटी नाही ... बेटी व्यवहार करा... संस्कृतीच मिश्रण आणि समन्वय याच गोष्टी समता असलेली समाज व्यवस्था निर्माण करतील. अनेक नद्यांच पाणी एकत्रित होता तेव्हा महासागर निर्माण होतो...

बाकी हा विषय असाच सुरु ठेऊ पुढिल भागात....