Tuesday, December 31, 2013

जात !! (भाग १)



-भाग्यतुषार


सध्या आरक्षण, मनुवाद ही संकल्पना आणि जातीचा अक्रंदी अभिमान भलताच फुलतो आहे. जन्माने-वंशाने लागलेल्या फालतू जाती विशेषणाचा अभिमान बाळगणे हा आजचा नवा ट्रेंड झाला आहे. इतक्या दिवस जातीय भावनेचा प्रचार पुस्तके, पॉम्पप्लेट व इतर माध्यमातून होत असे. आता तर या जातीचे बोंबील social media च्या माध्यमाने sophisticated form मध्ये तरुणांन समोर ठेवले जात आहे. यात भर म्हणजे वधुवर परिचय मेळावे. साली कल्पनाच पचत नाही की अश्या पद्धतीने गुराढोरांचा बाजार असल्यासारखं मुलं मुली शोधायच्या. 


सध्या बऱ्याच जाती विशेषण असलेल्या लोकांशी संपर्क चालू आहे. एक गोष्ट नक्की सांगतो कितीही गोरे असतील, कितीही श्रीमंत असतील आणि कितीही हिंदुवादी (हिदुत्ववादी नाही) असतील पण जातीचा भलता पोक्कळ अभिमान. मुलगी किवा मुलगा दुसऱ्या जातीत द्याची ना तयारी, ना मानसिकता आणि साध समर्थन पण नाही. आंबेडकरी जनतेच म्हणाल तर त्यांनी पार स्वताला सगळ्या समाजापासून तोडून टाकलं...किवा तोडले गेले ... जे काही असेल... द्वेषाच चक्र गोलच फिरणार. इतक्या दिवस सवर्णांनी दलितांचा द्वेष केला आता ते करता आहे. म्हणज शेवटी काय “eye for an eye”. 


या मानसिकतेत काय कितीही केजरीवाल येओ... किती मोदी येओ.... ये बावळट लोक जातीचा तुरा मिरवत समानतेच्या समाज व्यावास्तेचा फडशा पाडणारच. “XXXXX गेली समाज व्यवस्था...” हिचा भावना आज तुमचा आमचा मनात आहे. आमची मुलगी आमच्याच जातीत लग्न करणार... किवा मुलगा असो ... ते सगळं सारखचं. राजपूत, मराठे, गुजराती, मारवाडी, सिंधी, पंडित (ब्राम्हण), जैन  किवा बाकी कोणी, आपण यांना एक समाज विशेषण मानतो... जात नाही.. पण कितीही व्यापक विचार केला तरी हे विशेषण आणि हे गृहीत धरण समाज हिताच कधीच नसणार. हे जाती विशेषणचे आहेत. आपण फक्त “जात” न म्हणता याला “समाज” असा सभ्य शब्द वापरतो. पण संविधानात society आणि caste असे विगळे शब्द आहेत. हे दोन्ही समान नाही. लादेनला माननीय किवा श्री म्हणून त्याचा खरा अर्थ बदलणार का. 


मित्रहो डोळे उघडा... जात सोडा... नुसता रोटी नाही ... बेटी व्यवहार करा... संस्कृतीच मिश्रण आणि समन्वय याच गोष्टी समता असलेली समाज व्यवस्था निर्माण करतील. अनेक नद्यांच पाणी एकत्रित होता तेव्हा महासागर निर्माण होतो...

बाकी हा विषय असाच सुरु ठेऊ पुढिल भागात....

Wednesday, January 9, 2013

पण लक्षात कोण घेतो ?


डॉ. अभिराम दिक्षित (पुणे)



पृथ्वी एकदा निक्षत्रिय करता येईल ..... २१ वेळा कशी काय ? हा प्रश्न ह्या जाती वाद्यांना पडत नाही. पण लक्षात कोण घेतो ?. ब्रह्मणांच्यात जातीवाद पहिल्यापासून होताच . पण अखिल भारतीय ब्राह्मण संमेलनांचि उपस्थिती ब्रिगेड च्या उदयानंतर लक्षणीय वाढली ! आणी त्यानंतरच परशुराम सिक्स पेक बॉ डी बिल्डर झाला.........ब्राह्मण मराठा ह्या उच्च जातीचा संघर्ष चघळला जात आहे. जणु महाराष्ट्रात या दोनच जाती आहेत !! ह्या दोन जातींच्या पुस्तकी टोमणेबहादुरित सारा महाराष्ट्र वेठीला धरला आहे. 

ब्राह्मणांच्या घरात परशुरामाची कधीही पूजा होत न्हवती . ते उग्र दैवत आहे. ब्रिगेडच्या सामन्या साठी मैदानात उतरलेल्या चित्पावन महासंघाने प्रथम पुण्यात परशुरामाची भव्य पोस्टर लावली. सामन्यासाठी सिद्ध व्हावा म्हणुन त्याला जिम मध्ये धाडून सिक्स पेक पहिलवान बनविण्यात आले. देवतांचे स्वरूप कसे बदलत जाते ? ह्याचे हे उत्तम उदाहरण आहे. 

त्यामुळे परशुराम -- ब्रिगेड विरोधी ब्राह्मणांचे प्रतिक बनला . आता हे ध्यानात घेऊन संमेलनाच्या संयोजकांनी परशुराम टाळला असता तर बरे झाले असते. पण लक्षात कोण घेतो ? साहित्यिक समाजापासून तुटले आहेत याचे हे उत्तम उदाहरण आहे. 

याची दुसरी बाजू अशी की दैवतांना स्थानिक महात्म्य असते. सर्वजातीय कोकणी लोक परशुरामाला मानतात. कोकणस्थ ब्राह्मण हि याच कारणाने त्याला मानतात. नाहीतर आंतरजातीय विवाहाची संतान असलेला परशुराम चित्पावन महासंघाचा हिरो कसा काय ठरला ? (परशुरामाची आइ क्षत्रीय होती... आणि बाप ब्राह्मण ). 

देवतांच्या पुराणकथांना काही फारसा अर्थ नसतो. त्या ऐतिहासिक पुराव्याप्रमाणे घ्यायच्या नसतात. त्यात पुष्कळ परस्पर विरोध ठासून भरलेला असतो. पण लक्षात कोण घेतो ? चित्पावन महासंघाचा आंतरजातीय विवाहांना विरोध आहे तरी त्यांचा आयडॉल आंतरजातीय विवाहाची संतान असलेला परशुराम . कारण क्षत्रियांशि लढायला एक परशुधारी सिक्स पेक पहिलवान नको का ?

दुसरीकडे ब्रिगेडचा वर्णव्यवस्थेला ला विरोध आहे. ब्रिगेड म्हणते - " मराठे क्षत्रिय नसून ते शुद्र आहेत. त्यामुळे मराठ्याना आरक्षण दिलेच पाहिजे " आता ह्या बहुजन ब्रिगेडला त्या खर्या खोट्या क्षत्रियांशि देणेघेणे ठेवण्याचे काय कारण ? आणि क्षत्रिय संहारक परशुरामाला विरोध करण्याचे काय कारण ?

दाखवायचे दात बहुजन आणि खायचे दात क्षत्रिय असा हा ब्रिगेडी कावा आहे. बहुजन वादि ब्रिगेडी उच्चवर्णीय क्षत्रियांचि बाजू घेऊन रस्त्यावर येतात .... जातीय ब्राह्मण मराठ्यांना खिजवायला आपले नसलेले दैवत जिम मध्ये धाडतात..... साहित्यिक समाजापासून तुटलेले असल्याने ते हा घोळ अजून वाढवतात ....... दोन सुसंपन्न प्रस्थापित जातींच्या भंगार अस्मिता युद्धात सारा महाराष्ट्र वेठीला धरला जातो ......

आदिवासी उपाशी मरतात .. पाकडे आत घुसतात ... आसाराम बापू अकलेचे तारे तोडतात ....ब्राह्मण मराठ्याच्या अस्मितेशिवाय आपल्यासमोर दुसरे प्रश्न नाहीत काय ? महाराष्ट्रात या दोनच जाती आहेत काय ? ह्या अभिजनांच्या लढाईत .. आणि राजकीय फ़ंतुश्गिरिला मिडिया डोक्यावर घेऊन नाचतो ..... पण लक्षात कोण घेतो ??

Tuesday, January 1, 2013

SEX, SCANDAL & CHURCH (2)

(Regards to http://www.outlookindia.com/article.aspx?281625)
INTERVIEW
“When The Priests Drink, What Spews Out Is Absolute Filth”
The nun who walked out of her Kozhikode convent 14 years ago on what compelled her to leave

Sixty-seven-year-old Sister Mary Chandy walked out of the Congregation of the Daughters of Presentation of Mary in Chevayur, Kozhikode, 14 years ago. She wrote her autobiography,Nanma Niranjavale Swasthi (Peace to the One Filled with Grace), in April 2012. Excerpts from an interview:
What did you do after you left the convent?
I only had the clothes that I was wearing. I did not have any money. I remember envying men for they can sleep at night under a tree but a woman cannot do that. I would visit houses and ask for donations. My dream was to open an orphanage and look after unwanted children.
Is there one incident that made you quit the order?
There are so many incidents that hurt me. After I left the convent, I went through many trials and tribulations. It has been a long journey outside.
You have said that the priests drink during festive occasions?
Yes, both the priests and nuns drink wine and foreign liquor. When the priests drink, what spews from their mouths is absolute filth.
The Church says that you were only a cook for a brief period and not a nun in the convent?
If that is so, why have they kept my baptism certificate? It is now in their hands to prove I was not a nun.
What you say about the priests...does it hold for the majority of them?
No, there are many good priests and nuns who do a lot of good work. But then there are also the bad ones. My advice to young Catholic girls is to not to go for counselling or confession to the priests.

SEX, SCANDLE & CHURCH (1)

(Regards to http://www.outlookindia.com/article.aspx?281624)
SIVARAM V.
A nun at the Little Flower convent in Narakkal, Kochi
KERALA: THE CHURCH
To Cast The First Stone
Sex, violence, corruption, insider exposes rock the Kerala church


“Later, I’m taken to the priest’s room for coffee. While I’m having coffee sitting on the cot, the only place in the room to sit, he comes and embraces me hard, almost suffocating me. When I struggle to escape from his clutches, he squeezes my breasts and asks me to show them to him. ‘Have you seen a man?’ Stunned, I shake my head ‘no’. In no time, he undresses himself.”
Sister Jesme in her book Amen: The Autobiography of a Nun







“The convents and nunneries are being converted into brothels. The priests have sex with the nuns at night in these convents. Because of these acts, the chastity of the priests and nuns has come under suspicion. Their love for God has shrunk...some of the clergy protect their chastity by watching pornography and reading pornographic material. They lose themselves in this habit. These books and DVDs are kept in secret places and can’t be found easily.”

Father Shibu Kalamparambil in his memoir Oru Vaidikante Hrudayamitha (The Heart of a Priest)

***





“The cry of a baby came from the bathroom of one of the inner rooms along with the sobs of a woman. We used our might to force open the bathroom door and what we saw would break anyone’s heart. A nun who had given birth to a child was pushing the head of the baby into the closet. The bathroom was filled with blood. The legs of the child, which were sticking out of the closet, were kicking for life.”
Sister Mary Chandy in her autobiography Nanma Niranjavale Swasthi(Peace to the One filled with Grace)
***

On the gentle slopes of Pulpally, Wayanad, where the Naxal movement once sent terror into the hearts of the land-owning gentry, a lone ex-nun, Sister Mary Chandy, is raising the hackles of the Catholic church. Her autobiography, Nanma Niranjavale Swasthi, a no-holds-barred account of her life in the convent, is littered with pregnant nuns and wayward priests. The 67-year-old Sister’s memoirs comes a good 14 years after she walked out of the congregation of the Daughters of Presentation of Mary in Chevayur, Kozhikode, in north Kerala. The Church was quick to proclaim that Sister Mary was never a nun in any of their convents and asked the laity in Wayanad not to associate with her.
So what happened after she saw the nun trying to kill her newborn baby in a convent in Mananthavady in Wayanad, as she has described in autobiography? “After I broke open the door with the help of another nun, I grabbed the child and held it to my chest. I thought I was doing the right thing but the sisters turned against me. I want to know why. In a previous incident, when I hit a priest on his head with a stool when he tried to grab me, the nuns sympathised with the priest. From then on, I was watched carefully.” After 40 years, Sister Mary fled the convent life.


“Earlier, most of the nuns, priests suffered in silence. Now some are openly questioning the church.”Sara Joseph, Feminist Author
Mary Chandy’s book has many more such harrowing tales. Like the nun who had tried to commit suicide many times over telling her of priests coming to the convent well past midnight and taking nuns out to the nearby schools. When this nun was called, she would not open the door. She was terrified the priests would break down the door and come for her. She said she hated this life of fear and wanted to end it. In one chapter, Mary Chandy recounts how porn magazines and CDs are commonplace among the priests. In one instance, she says a young nun came to her crying as another senior nun was forcing her to watch these videos with her. Elsewhere, Mary describes feast days in the seminaries when wine flows freely and there is dancing and much else. Once a father asked her to join in the revelries saying life is meant to be enjoyed. When she refused, he threatened her with dire consequences.
Tell-all memoirs are not new in Kerala, nor are church scandals. The Sister Abhaya murder case (1992) has still not seen closure and in the last five years there have been three other cases of alleged nun ‘suicides’. But a nun coming out, writing an autobiography, warts and all, was a first even for Kerala. Sister Jesme’s autobiography three years ago caused quite a stir and embarrassed the church no end. Following close behind was Father Shibu Kalamparambil’s effort in 2010, which described in excruciating detail the depraved lives that many priests and nuns led. And now comes Sister Mary Chandy’s memoir, about nuns who got pregnant by priests and aborted foetuses and other such horror stories.
Noted writer and feminist Sara Joseph, whose novel Othappu incidentally explores the life of a nun who leaves the convent, says, “Most of the nuns and priests suffer in silence for suffering is a quality that they are conditioned to accept as a virtue. What you see here is the expression of the individual’s conflict with the establishment. They did not have the courage till now to take on the establishment but now they are openly questioning it.” Joseph Pullikunnel, editor ofHosanna and director of the Indian Institute of Christian Studies, says he hasn’t heard anything like this against the Catholic church, in such an open manner, ever before. “Perhaps the church was ‘whitewashing’ itself,” he says hesitantly.
Ex-MP and commentator Dr Sebastian Paul is a bit more unabashed about the sociological implications of these revelations: “These autobiographies have become bestsellers but the allegations they make have not been publicly debated. So there is not much impact on the organisation. The Catholic Church is a highly centralised organisation and there is very little criticism happening within.”
So will a soon-to-be-released film, aptly titled Father, Son and Holy Ghost, on the hardships and dilemmas faced by nuns, put things in perspective? “The Church is traditionally patriarchal. I have explored the lives of two nuns in a nunnery in my film and have touched on various aspects, including homosexuality and abortion,” says director T. Deepesh.
That doesn’t sound like things are going to get better. Father Paul Thelakat, spokesperson of the Syro-Malabar Catholic Church, says the fathers and nuns who have left the order and are writing books now are the ones who could not cope with the spiritual life. As he puts it, “If one cannot stay celibate, it is better to get out, marry and live happily. One is called to a difficult way of life; it needs an ascetic’s will to live a life of celibacy happily. It is always better to marry than to ‘burn’ mentally. I do not appreciate those who make a hue and cry of something they fail to live up to and then blame others for their failures. It is too naive to say, ‘since I could not, nobody can’.”













“You can’t make a hue and cry over something you can’t live up to, then blame others for their failures.”Fr Paul Thelakat, Spokesperson, Syro-Malabar Catholic Church
Kerala, incidentally, has now around 50,000 priests and nuns. And, incredibly, there are about 1,35,000 of them outside the state, serving in various institutions in India and abroad. Malayalis constitute a sizeable 15 per cent of the world’s Catholic priests and nuns. For the past few decades, their strength has been growing while the reverse is the case in the West. Brother Mani Mekkunnel, national secretary of the Conference of Religious India, points out that one cannot disregard the importance of Catholic institutions and the yeoman’s service they do to society. He feels the media picks on stray incidents and “unsubstantiated accounts” to judge the entire edifice of the Church and millions of its devout followers. “Why don’t you focus on the hundreds and thousands of priests and nuns who are living for a noble cause? Today, English education is synonymous with convent education. Catholic institutions have contributed in an immense way to India’s economic growth. Why not highlight that?”
Sara Joseph too stresses the unsubstantiated clause, saying if these writers want to be taken seriously they must reveal names. “Only if they are exposed can they be questioned,” she says. Take, for instance, Sister Mary’s book. It takes no names nor are dates clearly mentioned. Fr Stephen Mathew, director of Neethivedi, an NGO in Wayanad, points out, “We are suspicious because they haven’t revealed everything. A small minority may be behaving like this...but it is not good to generalise.”
The Church’s critics, though, offer a different view. They feel even if it’s only a handful of priests and nuns who have spoken out, it’s still a brave effort as it is unthinkable for the majority to speak against the strict order. There is both fear and subservience. Those who dare to leave this cloistered life are often not accepted by even their family and are ostracised by society. And most don’t even have a place to stay.
“Judas! Fallen Angel! Mad! These are some of the epithets being hurled my way by the church,” says Sister Jesme, 56, a former principal of St Mary’s College, Thrissur, fully at ease in a pair of red tights and a black T-shirt, enjoying her freedom in her tiny flat in Guruvayur. “I am foisted as an example to quell dissidents within the nunneries and seminaries. They preach that I have been disowned by my family and by the Church and the same would befall anyone who dares to be another Sr Jesme.” Fr Shibu says his parents were threatened by the Church. They were even told that they would not be buried in the church cemetery if they accepted him back home.
Curiously, this comes at a time when the Vatican itself is under attack. A tell-all bestseller,Sua Santita, has outed confidential personal letters between the Pope and his associates revealing many embarrassing details. Last month, the head of the Vatican bank was sacked on money-laundering charges. Many connected with the Church say the kind of depravity prevalent among the priests and nuns in Kerala and abroad is because of the arcane rules and practices. This perhaps is the time to usher in some much-needed reforms in the Catholic Church. As Dr Valson Thampu, principal of St Stephen’s College, Delhi, puts out, “Every institution stands in need of continual reform. What is not reformed or renewed is headed for death. Only those who are spiritually insensitive will resist reform.” So will the Church let more light into its pews or wait for another book by one of its own to rake up another scandal?

Sunday, October 21, 2012

युवकांच्या चश्म्यातून - आरक्षण.



साभार : http://drabhiram.blogspot.in/

थोड्या दिवसापूर्वी एका वाद विवाद स्पर्धेला परिक्षक म्हणून गेलो होतो. आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय स्पर्धा होती. २० ते २५ वर्षाची मुलं - मुली स्पर्धक होती. धर्माच्या आधारावर आरक्षण द्यावे का ? दिल्यास ते देशाच्या एकतेला बाधक होईल का ? - असा विषय होता.  प्रत्येक कॉलेज मधून दोन्ही बाजूंनी बोलण्यासाठी एक - एक विद्यार्थी पाठवायचा नियम होता. - तरुणांची भाषणं ऐकून टाळकं भणाणून गेलं होतं. कार्यक्रमाच्या शेवटी मी समारोपाला थोडसं बोललो. जे बोललो त्यात  भर टाकून लिहतो.








 रामभाउ म्हाळगी प्रबोधिनी च्या मुंबईतल्या कार्यालयात झाली स्पर्धा. विनय सहस्त्रबुद्धे, रविंद्र साठे आणी लोकसत्तेचे मुकुंद संगोराम  कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

मी म्हणालो -

तुमची भाषणं मी ऐकली. टाळकं भणाणून गेलं. घोर निराशेनी - पण थोडा आशेचा किरणही दिसला. आशेचा किरण हा की - अतिशय जिव्हाळ्याच्या - भावनिक - अस्मितेच्या  प्रश्नावर; चर्चा वाद - विवाद करण्याची तुमची तयारी आहे. नाहीतर सध्या मुद्दे  - गुद्द्यांनी आणी लाथांनी सोडवायची पद्धत आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात आहे. मधल्या खाण्याच्या वेळेला तुम्ही एकत्र हसत खेळत होता. नंतर स्टेजवर येउन तावातावाने भांडत होता. लोकशाहीचा पप्पा आणी पुरोगामिपणाचा फादर म्हणजे व्हॉल्टेर हा फ्रेंच विचारवंत. तो म्हणाला होता. "I do not agree with what you have to say, but I'll defend to the death your right to say it" . तुझे विचार मला अजिबात मान्य नाहित. पण वेगळे विचार बाळगण्याच्या - तुझ्या हक्काच्या -  रक्षणासाठी -  मी मरण पत्करायला तयार आहे. याला म्हणतात पुरोगामीपणा ! माणूस विचार करणारा प्राणी आहे यावर श्रद्धा बाळगणार्‍याला मी पुरोगामी म्हणेन. चर्चा करून समोरच्याचे विचार बदलता येतात हा पायाच आहे आहे पुरोगामीपणाचा. अशा प्रकारे ज्ञानाचे आदान प्रदान करत समाज प्रगतीच्या दिशेने पुढे न्यायचा. गामी म्हणजे जाणारा पण जायच कुठे ? पुरो - प्रगतीच्या दिशेला. पुरो - गामी.




                                                                         व्हॉल्टेर


आता निराशेबद्दल आणी डोकं भणाणण्या बद्दल - तुम्हा सर्वांचीच एक गोष्ट मला जाम खटकलीय.  जातीय आरक्षण आणी धार्मिक आधारावरच आरक्षण - यात जमीन आस्मानाचा फरक आहे. हा फरक कुणीच नीटपणी ध्यानात घेतला न्हवता. आरक्षणाचे समर्थक दोन्ही प्रकारच्या  आरक्षणाला पाठिंबा देत होते. आणी विरोधक दोन्हीला विरोध. आजचा विषय 'आरक्षण योग्य का अयोग्य ? ' असा न्हवताच मुळी. मित्रांनो ! विषय धार्मिक आरक्षणाबद्दल होता. त्याहून गंभीर गोष्ट म्हणजे अभ्यासाऐवजी -  "स्व" जास्त डोकावत होता. ज्यांना आरक्षण मिळतय ते त्याच्या बाजूचे आणी मिळत नाही ते विरोधक अशी स्पष्ट विभागणी दिसली ! काहि अपवाद होते. पण मोजकेच. त्याहून धक्कादायक म्हणजे , भारताचे संविधान, त्यातले धर्मस्वातंत्र्य , सेक्यूलर, सर्वधर्मसमभाव आणी धर्मनिरपेक्षता याबद्दल सर्वांनीच दाखवलेले भीषण अज्ञान. तुम्ही सर्व राज्यशास्त्र, इतिहास अशा कलाशाखांचे विद्यार्थी आहात तेंव्हा तुमच्याकडून काही नवे शिकण्यासाठी आलेला मी .....विज्ञानाचा विद्यार्थी.....असो. एक गोष्ट मात्र तुम्ही मला आज शिकवलीत. कोणती ? ते शेवटीच सांगतो भाषणाच्या.


आरक्षणाच्या विरोधकांनी आर्थिक आरक्षणाचा बूट वारंवार उगारला. सगळ्याच गरिबांना द्या वगैरे वगैरे. आरक्षण म्हणजे काय - गरिबी हटाव चा सरकारी कार्यक्रम वाटला की काय तुम्हाला ? का भीक वाटली ? गरिबांना मदत म्हणून भरपूर सरकारी योजना असतात. वेगळ्या रंगाच रेशनकार्ड असतं,  सबसिड्या असतात. बहुसंख्य दलित गरिब आहेत हे खरे आहे.  पण ते गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण दिलेलं नाही. सामाजिक गरजेतून दिलेलं आहे. बर... आरक्षणाची सुरवात कोणी केली ? आंबेडकरांनी ? अजिबात नाही ! शाहू महाराजांनी ? बिल्कूल नाही ! आरक्षणाची सुरवात केली भगवान मनूनी ! किती टक्के ? तर १०० % ...कोणाला ? तर उच्चवर्णीयांना. हे विपरीत आरक्षण होतं मित्रांनो. ब्राह्मण, क्षत्रीय आणी इतर पुढारलेल्या जातींनी गेली हजारो वर्षे या विपरीत आरक्षणाची मजा घेतली. १००% सत्ता, १००% धर्माधिकार, १००% न्यायव्यस्था, १०० % उच्च उत्पादनाचे उद्योग, १००% शेतजमीनी  गेली हजारो वर्षे ठराविक जातींच्याच हातात होत्या. पुण्याच्या एका विद्यार्थ्यानं मगाशी लंगड्या घोड्यांची गोष्ट सांगितली. त्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेल आहे. घोड्यांची शर्यत लावली. सगळे घोडे तगडे. एक मात्र लंगडा. मुद्दाम लंगडा केलेला घोडा. कुणी केला त्याला लंगडा ? तर तगड्या घोड्यांनी. ही काय स्पर्धा झाली ? मेरीट माय फूट ! त्या लंगड्या घोड्याला आरंभरेषेच्या थोडं पुढे उभ कराव लागेल. तेंव्हाच खरी स्पर्धा होईल. हे आहे सामाजिक आरक्षण. २२.५ %. लोकसंखेच्या प्रमाणात. दलित आणी आदिवासिंना , भटक्या आणी विमुक्तांना दिलय. रेषेच्या पुढं उभ केलय. काय चुकलं ? गेली हजारो वर्षे अभ्यासाची परंपरा नाही. पाढे बापानी शिकवले नाहित. आईनी अभ्यास घेतला नाही. देवळात यायला बंदी. शिकायला बंदी. अस्पृष्यता. मग रेषेच्या पुढे उभ करा त्याना. त्यालाच म्हणतात सामाजिक आरक्षण. सरकारी जावई न्हवे. दुबळा भाउ म्हणा.

दुसरी गोष्ट आर्थिक आरक्षणाची. तेही आहेच की दिलेलं . फक्त गरीब व्यक्तींना ते दिलेलं नाही. गरीब जातींना दिलय. त्याला म्हणायच ओ. बी. सी. आरक्षण. गरीब व्यक्तींना कसं देणार आरक्षण ?  गरीब शोधायचा कसा ? माझ  हॉस्पिटल आहे. भावाचा कारखाना आहे. बायकोच्या नावावर काही नाही. ती झाली की गरीब !  माझ होस्पिटल बायकोच्या नावावर केलं की मी झालो गरीब ! समजा एक श्रीमंत व्यापारी आहे. सोन्याच्या दागिन्यांच दुकान आहे त्याचं. . डान्स बार मधे उधळल्या - गड्याच्या गड्या -  नोटांच्या. दारू प्याला.शौक केला. बाई ठेवली. उधळले सगळे पैसे. झाला गरीब. बोला.. देणार त्याला आरक्षण ? एक महा मूर्ख आहे महिपतराव , एक आळशी  आहे सुस्तराव ... दोघेही गरीब आहेत. देताय आरक्षण ह्या दोन रावांना  ? म्हणे आर्थिक आधार ! सरसकट गरीबांना आरक्षण देता येत नाही हो. तो का गरीब झाला हे पहाव लागत. तो त्याच्या वैयक्तिक दुर्गुणांमुळे गरिब आहे का ? की त्याला संधी नाकारलीय व्यवस्थेनं. श्रीमंत होण्याची संधी. भारतात जातिव्यवस्था आहे. ते एक भयानक वास्तव आहे. जेंव्हा जातीच्या जाती गरीब रहातात. तेंव्हा नक्कीच त्याना संधी नाकारलेली असते. समाजान. व्यवस्थेन. अरे सुतारान सुतारच राहायच. लोहारान लोहार. जास्त पैशे मिळणारे धंदे करायचेच नाही त्यानं. कोणी नाकारली संधी ? -  पैशे मिळवण्याची संधी? व्यवस्थेन. म्हणून अनेक जाती गरीब राहिल्या. मग आला मंडल आयोग. मंडल न काय केलं ? निकष लावले. शैक्षणीक, सामाजिक आणी आर्थिक. मंडल ने पहाणी केली सगळ्या जातींची. शिक्षणाचं प्रमाण कुठल्या जातित कमी आहे ? कोणत्या जाती गरीब आहेत ? त्यांना म्हटलं ओ.बी.सी. आणी दिलं आरक्षण. या ओबिसीत माळी आणी कुणबी यासारख्या शेतकरी जाती आहेत. दैवेज्ञ ब्राह्मण ही उच्चवर्णीय जात ही आहे ओबीसी आरक्षणात. तेंव्हा गरीब किंवा मागास उच्चवर्णीयांना आधीच आरक्षण मिळालेलं आहे.  पुन्हा द्यायचा प्रश्नच कुठे येतो ?  तेंव्हा लक्षात ठेवा आर्थिक आधारावर आरक्षण व्यक्तीला देता येत नाही. गरीब जातीना देता येत  - ते दिलेलंच आहे. मग आर्थिक आरक्षणाचा बूट काय म्हणून?

जातिय आरक्षणाचा काहिना  - काही व्यक्तीना गैर फायदा होतो म्हणे. मागासवर्गीय कलेक्टरचा मुलगाही आरक्षण मिळवतो. अरेच्च्या पुन्हा तेच तेच. जातिच्या लॉब्या असतात की नाही ? ज्यांच्या लॉब्याच नाहीत सत्ताकारणात. त्याना पुढे आणायला आहे आरक्षण. ते व्यक्तीला नाहीच -  समाजाला आहे. बटाट्याची तुलना बटाट्याशी करा हो - टोमेटोशी नको. जर ठराविक समाजाला आरक्षण आहे तर - "व्यक्ती गैरफायदा मिळवतेचा" -  टॉमेटो आणला कुठून ?  हरेक व्यक्तीच्या मागासपणाची कारण शोधणं सरकारला शक्य नाही. जातींच्या मागासपणाची कारणं शोधता येतात आणी त्यावरचा उपाय म्हणजे आरक्षण. मग विचारता हे संपेल कधी ? प्रश्न विनोदी आहे. आरक्षण म्हणजे सत्ताकारणातला न्याय्य वाटा. तो संपायला कशाला पाहिजे ? जेव्हढे टक्के हक्काचा वाटा आहे. तो मिळालाच पाहिजे. कायम.निरंतर.मिळाला पाहिजे आणी  अनुशेष म्हणजे काय ? मागासांना आरक्षण आहे २२.५ % + २७.५ % ओबीसींना = ४९ %.

एकूण आरक्षण ४९ %

बर हे आरक्षण कागदावर आहे. खरोखर जागा भरल्या किती. दिल्लीत कॅबिनेट सचीव दर्जाच्या ९६ पोस्ट आहेत. दलित किती त्यातले १ . फक्त एक. म्हणजे एक टक्का. ओबीसी कीती. अ ग्रेडचे केंद्र सरकारी अधिकारी घेतले तर त्या ओबीसी ४% हून कमी आहेत. म्हणजे ४९% आरक्षण फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात ते आलेलच नाही. राखीव जागांचा अनुशेष भरून काढणे अजून बाकी आहे. आधी अनुशेष भरा नंतर तोंड वर करून विचारा की - संपेल कधी ? पदोन्नती मध्ये आरक्षण दिलं पाहिजे ते म्हणूनच. अनुशेष भरण्यासाठी.

घरात घुशी झाल्या म्हणून कोणी घर जाळत नाही. तस  कुठल्याही सरकारी योजनेत काही दोष रहाणारच. म्हणून कुणी योजनाच बंद करत नाही. शिवाय श्रीमंत ओबीसींना म्हणजे क्रीमी लेयरला आरक्षणाचे लाभ मिळतही नाहीत. तशी तरतूदच कायद्यात आहे. प्रथम अनुशेष भरला पाहिजे. सत्तेत हक्काचा वाटा मिळाला की हळूहळू लंगडा घोडा तगडा होईल. स्वतःच्या हिमतीवरच पळू लागेल. स्पर्धा करेल ओपनशी. माझ्या एका मित्राची गोष्ट. विजय. तो ओबीसी आहे. ओबीसीच्या सीटांचे मार्क क्लोज झाले ओपनच्या वर. त्याला आरक्षणाचा काहिच उपयोग झाला नाही. ओपनलाही काही तोटा नाही. त्या कॉलेजपुरत तरी -  आरक्षण नसल्यातच जमा. या एव्हढ्या शर्यतीपुरता घोडा तगडा झालाय. आरक्षण अस संपतं. आपोआप. हा मुद्दा एका एकाही स्पर्धकान मांडला नाही.

आता आपण आजच्या खर्‍या विषयावर येवू. धार्मिक आरक्षण. म्हणजे मुस्लिम आरक्षण. कारण मुसलमान अल्पसंख्यातले बहुसंख्य आहेत. मुस्लिमांना आरक्षण द्यावे का ? दिल्यास भारतातली एकात्मता वाढेल का कमी होईल ? 


संविधान आणी सर्वधर्म समभाव हा विषय प्रत्येकाने चघळला. आणी प्रचंड घोळ घातला. सभ्य स्त्री - पुरुष हो - आपल्या राज्यघटनेत सर्वधर्मसमभाव नाही. धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य ही घटनेत नाही.  घटनेत सेक्यूलारिझम आहे. सर्वधर्मसमभाव आणी सेक्युलारिझम या एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत. सर्वधर्म समभाव. सर्व धर्म सारखेच आहेत. त्यांची शिकवण एकच आहे. सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छती -  ही हिंदुधर्माची शिकवण आहे. संविधानातला कायदा न्हवे ! उलट धर्मपालनाचे कोणतेच हक्क संविधान देत नाही.

तुम्ही सगळे प्रेमात पडायच्या वयाचे आहात.   आणी कुणाच्यातरी प्रेमात पण असणार. जो - जी नसेल त्यान कार्यक्रम संपल्यावर मला येऊन भेटावं. शनिवारवाड्यावर जाहिर सत्कार करण्यात यील. असो ..समजा तुम्ही ट्रेन नी कुठेतरी प्रवास करत आहात. समोर एक अप्सरा बसली आहे. यौवन बिजली.. पाहून थिजली.. इंद्रसभा भवताली. अप्सरा दिसली. तुम्ही मनातल्या मनाततिच्यावर प्रेम करत आहात. असे प्रेम करण्याचे स्वातंत्र्य ती अप्सरा तुम्हाला अवश्य दील. पण मनातल्या मनात. मांडे खा. पण मनातल्या मनात. तिला ट्रेनमधे डोळा मारला ; की काय खायच ? सँडल !





भारताच्या राज्यघतनेत सेक्युलारिझम आहे. म्हणजे इहवाद आहे. कुठल्याही धर्मावर तुम्ही श्रद्धा ठेवू शकता. प्रेम करू शकता पण कसं ? मनातल्या मनात ! तुम्ही म्हणाल आमच्या धर्मात अस्प्रुश्यता आहे. आम्ही ती पाळणार... मग काय खायचं ? सँडल.
तुम्ही म्हणाल आमच्या कुराणात लिहिलिय . मूर्त्या फोडा. काफरांविरुद्ध जिहाद करा. म्हणा की. पण. मनातल्या मनात म्हणायच. खरोखर कुणी जिहाद करू लागला- तर काय खायच ? ....सँडल.
धर्माच्या चिकित्सेत संविधान शिरत नाही. पण २५ व्या कलमात बजावून सांगतं - धर्म पाळायचा पण मनातल्या मनात. इहलोकात कसं जगायच ? ते कायदा ठरवेल. लग्नाच वय किती असावं ? कायदा ठरवेल धर्म नाही.

सर्व धर्म चांगले आहेत ते जवळ घ्या म्हणजे सर्वधर्म समभाव. शासकीय निर्णयातून धर्म वगळा. धर्म दूर ठेवा म्हणजे सेक्यूलारिझम. म्हणजे च इहवाद. हा सेक्युलारिझम आपल्या संविधानाचा पाया आहे.  आणी अशा प्रकारचा पारलौकिक श्रद्धेसाठीचा कोणताही धर्म तुम्ही पाळू शकता. नवा धर्म बनवू शकता. धर्म बदलू शकता. धर्मांतराचे स्वातंत्र्य ही आहे.


आता मला सांगा. शासकीय निर्णयात धर्म आणायचा नाही हाच जर सेक्युलारिझम चा अर्थ आहे तर धर्मावर आधारित आरक्षण कसे काय देता यील ? दुसरं धर्म ही ऐच्छीक गोष्ट आहे. धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य आहे तर धर्मावर आधारित आरक्षण कसे देता यील ?


नीट विचार करा. समजा मुस्लिमांना आरक्षण दिलं. तर मुस्लिम कोण ? हे ठरवायचं कसं ? सुन्नी म्हणतात की शिया हे खरे मुसलमान नाहीत. कादियानी / अहमदिया पंथाचे लोक खरे मुसलमान नसून ते काफिर आहेत. त्यांच्या विरुद्ध जिहादचे फतवे ही निघतात पाकिस्तानात. मुसलामान कोण ? व्याख्या काय मुसलमानाची ? नाव ? समीर आणी कमल नावाच्या मुसलमानांना मी ओळखतो. अंतुले आडनावाचे मुसलमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.  सरकारने मुसलमानाची पहिल्यांदा व्याख्या करावी लागेल. टोपी, दाढी, नमाज हे सर्व नाकारणारे ही मुसलमान असतातच.
म्हणजे शेवटी सरकारला अ‍ॅफीडेव्हीट घ्यावे लागेल की मी मुसलमान आहे. आणी मगच आरक्षण देता यील.

पण गोची अशी आहे की घटनाकारांनी धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.  आरक्षण मिळवण्यासाठी मी काय करावे ? एक अ‍ॅफीडेव्हीट करावे. मी मुसलमान आहे. आरक्षणाचा लाभ मिळाला की पुन्हा धर्म बदलावा. हिंदू व्हावे. आता सरकार काय करणार ? माझी नोकरी काढून घेणार ? बर मी समजा सुमडीत धर्म बदलला. गुपचूप.  तर सरकारला कसे कळणार ? आरक्षणाचा लाभ मिळालेले लोक इस्लाम पाळतात का ? यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकार मौलवींची कमीटी नेमणार आहे काय ?

अहो दिवसातून पाच वेळा धर्म बदलता येतो. एक अ‍ॅफीडेव्हीट खेळ खलास. जी गोष्ट ऐच्छीक आहे ती गोष्ट कुठल्याही सवलतीसाठी अट म्हणून घालता येत नाही. एवढी साधी गोष्ट सरकारला कळू नये.

जातीचे खोटे दाखले मिळवून सवलती लाटणार्यांवर कायदेशीर कारवाई करता येते. कारण जात बदलता येत नाही. त्यात जन्म घ्यावा लागतो. पण धर्म ही ऐच्छीक बाब आहे. त्यावर आधारित सवलती देता येत नाहीत. धर्मांतराचे स्वातंत्र्य आणी धार्मिक आधारावर सवलती एकाच वेळी कशा देता येतील.

समजा उद्या तोगाडीयांनी हिंदू बांधवांना आवाहन केल - कोर्टात अ‍ॅफीडेव्हीट करून सवलती आणी आरक्षण लाटण्याच.. काय करणार तुम्ही ?


सर्वात महत्वाच  - आज मुस्लिमांना आरक्षण आहेच. मुस्लिमातल्या मागास जातींना आरक्षणाचा लाभ मिळतोच आहे. सर्वच धर्मातल्या मागास आणी गरीब जातींना आरक्षण आहे. ते तसेच राहिले पहिजे. पण सरसकट सर्व मुस्लिमांना आरक्षण मिळू शकत नाही. कोणत्याच धार्मिक आधारावर आरक्षण मिळू शकत नाही.  फक्त एका स्पर्धकाने हा मुद्दा मांडला त्याला पहिलं बक्षिस देत आहोत.

मुस्लिमांना समजायला हव की धार्मिक आधारावरच आरक्षण घटनाविरोधी तर आहेच पण;  ते देता येणंही अशक्य आहे. त्यामुलेच ते कोर्टात टिकणार नाही. सरकार तुम्हाला उल्लू बनवते आहे.

 तुमच्या सर्वांकडून शिकलेली एक गोष्ट म्हणजे वक्त्याने उगीच बडबड करत बसू नये वेळ संपली की भाषण बंद करावं. तुम्ही सर्वांनी बरोब्बर दिलेल्या वेळेत भाषण संपवलीत. तुम्च्याकडून मी हे शिकलो. आता आचरणात आणतो आणी भाषण संपवतो.

 - डॉ. अभिराम दीक्षित, पुणे 

रामदासाचा मूर्ख


साभार : http://drabhiram.blogspot.in/

सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ।। असे एक समर्थवचन आहे. बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिकांना ; रामदास स्वामिंच्या वेळी महाराष्ट्रात बटाटा न्हवताच; तो युरोपियनांनी मागाहून आणला हे जसे माहित नसते तसेच - ह्या समर्थवचनाचा अर्थ (संस्कृती रक्षक) धर्मप्रेमी कसा लावतात? हे मला देखील माहित नाही. मी मात्र माझ्या परीने ह्या ओळीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. पूर्वजांची कीर्ती सांगणारा माणूस मूर्ख म्हटला पाहिजे असा त्याचा अर्थ. पुरा श्लोक असा आहे -


आपली आपण करी स्तुती| स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ||१२||


" क्ष " नावाचं येडं स्वतः संकटात आहे तरी स्वतःच स्वतःची स्तुती करतो आहे. वडलांची कीर्ती सांगतो आहे तो क्ष मूर्ख म्ह्टला पाहिजे. मूर्खलक्षणात हे येते. हे मूर्खलक्षण त्रिकालाबाधित असल्याने क्ष च्या बापाला, त्याच्या आज्याला आणि पणज्यालाही लागू होते. म्हणजे पूर्वजांची कीर्ती सांगत बसू नये - स्वतःच्या हाताने काहितरी करून दाखवावे असा ह्या श्लोकाचा अर्थ घेता यील. रामदास प्रयत्नवादी असल्याने त्यांनी स्वतःच्या हाताने काहितरी करण्यावर भर द्यावा हे ठीकच. पण बापजाद्यांचा उदोउदो करत सुद्धा प्रयत्नवादी रहाता यीलच की ! खरी गोम इथेच आहे.

किंबहूना बापजाद्यांचा उदोउदो करण्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत असेही बहुत समर्थभक्त वदतील. पण असे केल्याने संकटाचा नायनाट, विपत्तीचे हरण होत नाही हा मुद्दा आहे. मानवांचे पूर्वज माकड होते हे शास्त्रीय सत्य आहे. त्यानंतर आपल्या रानटी पूर्वजांची निर्मिती झाली. आजच्या मानवजातीचे पूर्वज रानटी होते. हा मुद्दा आहे.





गेल्या दहा हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर मनुष्याची झालेली प्रगतीच दिसून येते. हाच नियम गेल्या दहा शंभर आणी हजार वर्षालाही लागू पडतो. मनुष्य आपल्या ज्ञानाचा संग्रह करतो आणि तो पुढच्या पिढीला देतो. हे ज्ञान पाठांतरित, मुद्रित किंवा किंवा कशाही स्वरूपात पुढच्या पिढीला देता येते. त्यामुळे आज्यापेक्षा नातवाकडे जास्त ज्ञान असते. नातू जेंव्हा आजा होतो तेंव्हा त्यालाही हा नियम लागू होतो.
हा नियम खुद्द समर्थ रामदास स्वामींनाही लागू होतो. त्यांना वंशपरंपरेने जे ज्ञान मिळाले होते त्यात त्यानी दासबोध रचून भरच टाकली असे म्हणावे लागते. आणी त्यानंतरच्या पिढ्यांनी समर्थांचाच कित्ता गिरवत त्यात अधिकाधिक भर टाकली हे ओघानेच येते. बटाट्याच्या किसाचा उल्लेख म्हणुनच केला. बटाटा हे अन्न युरोपियनांनी भारतात आणले. त्या आधी ते भारतात न्हवते त्यामुळे ते उपवासासाठी धर्म्य असण्याचा प्रश्नच न्हवता. धर्म आणी संस्क्रुती काळबरोबर बदलत जातात. आणी समर्थशिष्य कल्याण आणि उद्धवाच्या नशिबात नसलेली चमचमीत साबुदाण्याची खिचडी मला खायला मिळते. साबुदाणा ही पोर्तुगीजांनी आणलेली गोष्ट आहे हे ही लक्षात ठेवावे लागेल.

http://en.wikipedia.org/wiki/Tapioca



हल्लीची पिढी एकदम चुकार म्हणत बोटे मोडणे सोपे आहे - पण पूर्वीच्या पिढीतहि असेच म्ह्टले जायचे हे एकदम सत्य आहे . खरी गोष्ट अशी आहे की - बापाचे ऐकायचे असे आपण ठरवले असते तर आपण आजही गुहेत राहत असतो. जी गोष्ट विज्ञान आणी तंत्रज्ञानाबाबत खरी आहे. तीच गोष्ट नीती आणि सदाचाराबाबतही खरी आहे. हिंदुधर्म जर परिपूर्ण असता - तर दासबोध लिहिण्याची गरज काय होती ? जुन्याच एखाद्या ग्रंथाच्या प्रती समर्थानी काढल्या असत्या तर चालले असते की. कष्ट करोनी घसरावे म्लेंच्छावरी असे आधी कुणी म्हटले न्हवते. रामदासाने ते म्हटले. त्यात आपण पूर्वजांचा अपमान करत आहोत असे त्यांना वाटले नाही. नवनिर्मीती हा निसर्गनियम आहे. रामदासांचे  मला पटत नाही. माझे जातिव्यवस्थेबद्दलचे विचार वेगळे आहेत असे म्हणणे हा रामदासाचा अपमान नाही. कलियुग होउन गेले आहे आणि सत्ययुग आता आणायचे आहे .





समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची आताशा कुठे व्यापक प्रमाणावर चर्चा चालू झाली आहे. ह्याची फळे पुढ्च्या पिढ्यांना मिळणार आहेत. लहान मुल जन्मते, रांगते, उभे राहते, चालते, धावते त्याची प्रगती होते हा निसर्गनीयम आहे. त्याचप्रमाणे पुढच्या पिढीकडे आपण ज्ञान संक्रमित करत जातो आणी पुढ्च्या पिढ्यांची प्रगती होते हाही निसर्गनियम आहे. ह्या नियमातून रामदासाची सुटका नाही. परशुरामाची सुटका नाही;मुह्हम्मद, तुकाराम, बुद्ध आणी आंबेडकरांचीही सुटका नाही.


हे जेव्हढ्या लवकर कळेल तितके उत्तम !

आपणासी जे ठावे | ते इतरांसी सांगावे |
शहाणे करूण सोङावे अवघेजण - रामदास


  - डॉ. अभिराम दीक्षित, पुणे

Tuesday, March 13, 2012

कल्पना सरोज- एक ओळख... जिद्द आणि मेहनतीच...


नववी शिकलेल्या दलित समाजाच्या ज्या कल्पना सरोजने मुंबईत २ रुपये रोजगारावर दिवस काढले, त्याच कल्पना सरोजने १६५ कोटी कर्ज असलेली ५५० कामगार देशोधडीला लागलेली कमानी ट्यूब्स लिमिटेड हि कंपनी ताब्यात घेवून यशस्वीपणे चालवून दाखवली. आज १०० कोटींची उलाढाल करणारी हि कंपनी येत्या काळात ३ हजार कोटींची उलाढाल करेल असा त्यांना दृढ विश्वास आहे. 

वडील पोलीस खात्यात होते तर आई अशिक्षित होती. त्यांनी तिचे लग्न वयाच्या १२ व्या वर्षीच लावून दिले. ते लग्न म्हणजे त्या कोवळ्या मुलीसाठी नरक यातनाच ठरल्या. त्यामुळे तिला लवकरच माहेरी परतावं लागलं. समाजाने दिलेल्या वागणुकीने त्यांचा जीवनावरचा विश्वासच उडाला. आणि त्यांनी आत्महत्येचा असफल प्रयत्न केला. तेव्हाच त्यांना आयुष्याचा खरा अर्थ कळला. मोठ्या उमेदीने त्या पुन्हा उभ्या राहिल्या. वयाच्या २२ व्या वर्षी त्या मुंबईला आल्या. आईने शिकवलेल्या शिवणकामामुळे त्यांना २ रुपये रोजगारावर मुंबईत काम मिळाले. तिच्या कामाचे कौतुक झाल्या मुळे लवकरच तिला दरमहा ४०० रुपये पगार मिळाला. आयुष्यातील तो फार आनंदाचा क्षण होता. फर्निचरचा व्यवसाय असलेल्या एका तरुणाशी त्यांनी लग्न केले. पण दुर्दैवाने तिची पाठ काही सोडली नाही आणि त्यांच्या पतीचे अकाली निधन झाले. जेमतेम शिक्षण झालेल्या कल्पना सरोजला दोन मुलांच्या भविष्यासाठी तरी पाया वर उभे राहणे भाग होते. 

पतीचा व्यवसाय जिद्दीने सांभाळत त्यांनी स्टील कपाटे बनविण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतले. बघता बघता गाठीला चार पैसे जमले तेव्हा त्यांनी रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केला. १९९५ मद्धे त्यांनी अवघ्या अडीच लाखाला एक भूखंड खरेदी केला, जो त्यांनी काही वर्षापूर्वी तब्बल ४० कोटीला विकला आणि त्यानंतर त्यांचे नशीबच बदलून गेले. डबघाईला आलेला एक साखर कारखाना त्यांनी खरेदी केला. बघता बघता एकाचे दोन कारखाने झाले. अशावेळी कमानीचे काही कामगार त्यांना भेटले आणि त्यांनी त्यांना आपली कंपनी खरेदी करायची विनंती केली. कंपनीवर प्रचंड कर्ज होतं. कामगारांची देणी आणि दीडशे खटले होते. तरी त्यांनी मोठ्या जिद्दीने ती कंपनी विकत घेतली. कामगारांची देणी चुकती करून नफ्यातही आणून दाखवली. तेव्हा रतन टाटा पासून सर्वच उद्योगपतींनी त्यांना शाबासकी दिली. ५०० कोटीचे साम्राज्य उभे करणाऱ्या कल्पना सरोज यांचा एक मुलगा पायलट आहे. तर मुलगी लंडन मध्ये हॉटेल म्यानेजमेंट शिकत आहे. लवकरच त्या हेलीकोप्तरही घेणार आहेत. अशा या महान महिलेच्या कर्तुत्वाला आमचा  त्रिवार सलाम.